मोठय़ा मूर्तींचे करायचे काय? विपेत्यांसमोर प्रश्न
प्रतिनिधी/ बेळगाव
गणेशोत्सव अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपला तरी अद्याप गणरायाच्या आगमनाची लगबग कुठेही दिसून येत नाही. घरगुती गणेशमूर्ती खरेदी करतानाही लहान मूर्तींकडेच गणेशभक्तांचा ओढा दिसत आहे. आपल्या बजेटमध्ये परवडतील अशाच मूर्ती विक्री करण्यात येत आहेत. यामुळे 2 फुटांपेक्षा मोठय़ा गणेशमूर्तींचे करायचे काय? असा प्रश्न गणेशमूर्ती विक्री करणाऱयांना पडत आहे.
मागील वषी अतिवृष्टी तर यावषी कोरोनाचे संकट गणेशोत्सवावर आहे. कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्यामुळे बरेच दिवस लॉकडाऊन करण्यात आले होते. याकाळात व्यवसाय बंद होते, व्यापार थंड होता. यामुळे सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली होती. या सर्वांचा परिणाम हा गणेशोत्सवावर दिसत आहे. एरव्ही गणेशोत्सवासाठीच असणारी धामधूम यावषी अद्याप कुठेच दिसत नाही. गणेशोत्सव अवघ्या 8 दिवसांवर आलातरी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी देखील नाही.
गणेशमूर्ती तयार करण्याचे काम हे वर्षभर सुरू असते. त्यामुळे मार्च महिन्यापूर्वीच गणेशमूर्तींनी आकार घेतला होता. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही मूर्तीकारांनी गणेशमूर्ती तयार केल्या. या मूर्तींवर शेवटचा हात फिरत असतानाच कोरोनाचे संक्रमण सुरू झाले. यानंतर सर्व व्यवहार ठप्प होते. नंतर कच्चामालाचे वाढलेले दर, वाढलेला वाहतूक खर्च याचा परिणाम गणेशमूर्तींच्या किंमतींवर झाला आहे.
लहान मूर्तींना मागणी
यावषी नागरिकांना आर्थिक चणचण जाणवत असल्यामुळे लहान गणेशमूर्ती खरेदी करण्याकडे ओढा आहे. दीड फूटांपासून ते दोन फूटांपर्यंतच्या गणेशमूर्तींना सर्वांधिक मागणी आहे. त्यामुळे त्याहून मोठय़ा असणाऱया गणेशमूर्ती काय करायच्या, असा प्रश्न विपेत्यांसमोर आहे. मोठय़ा मूर्तींच्या किंमती 3 हजारांपासून पुढे असल्याने यामूर्ती अद्याप विक्री झालेल्या नाहीत.









