महाराष्ट्रात लसींचा तुटवडा : केंद्र सरकारने रुग्णसंख्येनुसार लसींचे वाटप करण्याची गरज
वार्ताहर पंढरपूर
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. केंद्र सरकारकडून सुरूवातीला परदेशात लसींचा पुरवठा केला गेला. आपल्या देशात तयार होणारी लस आपल्या लोकांना मिळायला पाहिजे. नुकतेच भारतात लसींच वाटप करण्यात आले आहे. परंतु यामध्ये फक्त राज्याला 7 लाख 50 हजार लसी मिळाल्या आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात राज्याला लसींचा पुरवठा केला जात नसून केंद्र सरकार लस पुरवठयात दुजाभाव करीत असल्याचा आरोप उपमुख्यमंञी अजित पवार यांनी केला आहे.
श्रेयस पॅलेस,पंढरपूर येथे भाजपाचे कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. कार्यक्रमानंतर कल्याणराव काळे यांच्या फार्म हाऊसवर उपमुख्यमंञी अजित पवार यांनी पञकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार संजयमामा शिंदे, कल्याणराव काळे, प्रकाश पाटील, उमेश पाटील, संभाजी शिंदे, अनिल सावंत आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्राला लसींचा पुरवठा न केल्याने लसीकरणात अडथळे निर्माण होत आहेत. लसनिर्मिती व वितरणावर केंद्र सरकारचे नियंञण आहे. ज्या राज्यात कोरोना रुग्ण जास्त आहेत त्याठिकाणी जास्त लस पाठविल्या तरच कोरोना नियंञणात येणार आहे. लाॅकडाऊनमुळे लोकांचे हाल होत आहेत. राज्यात कडक निर्बंध ठेवले तरच कोरोना आटोक्यात येणार आहे. ठराविक दिवसात लसीकरण पूर्ण करायच्या दृष्टीकोनातून वैद्यकीय व शासकीय यंञणा कामाला लावली आहे.
वाझे या व्यक्तीला मी कधीहि भेटलो नाही. तसेच माझे वाझेशी कधी संभाषणदेखील झाले नाही. परंतु त्याने माझ्या नावाचा उल्लेख करण्याचे कारण नव्हते. माझ्यावरील आरोप धादांत खोटा आहे. अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामध्ये माझीही चौकशी करावी, चौकशीत ‘दूध का दूध पानी का पानी’ होईल. विरोधक हे सरकार पाडण्यासाठी कटकारस्थान करीत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









