पंतप्रधान मोदींनी घेतला लसनिर्मितीचा आढावा : अहमदाबाद, हैदराबादसह पुण्यातील ‘सिरम’ला दिली भेट
अहमदाबाद, हैदराबाद / वृत्तसंस्था
कोरोना लसीच्या विकासाबाबत काय परिस्थिती आहे याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे या तीन शहरांचा दौरा केला. या दौऱयात त्यांनी लसनिर्मिती करणाऱया कंपन्यांकडून लसीसंबंधीची माहिती घेत निर्मात्यांना शाबासकीही दिली. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादच्या जायडस कॅडिलाच्या कोरोना प्रतिबंधक लसीचा आढावा घेतला. त्यानंतर ते हैदराबादच्या दिशेने रवाना झाले. दिवसअखेर पुणे येथील सिरम इन्स्टिटय़ूटला भेट देत कोरोनावरील लसीसंबंधीची सर्व माहिती जाणून घेतली.
अहमदाबादमधील झायडस बायोटेक पार्क, पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया आणि हैदराबाद येथील भारत बायोटेक या कंपन्यांमध्ये लसीचे उत्पादन करण्यात येत आहे. या ठिकाणी भेट देऊन कोरोनाच्या लस उत्पादनाची स्थिती जाणून घेण्यासाठी पंतप्रधानांनी तिन्ही कंपन्यांना भेट दिली. अहमदाबाद विमानतळावर सकाळी 9 वाजता पंतप्रधान मोदींचे आगमन झाले होते. त्यानंतर मोदी झायडस कॅडिला कंपनीच्या दिशेने रवाना झाले. अहमदाबादपासून 20 कि.मी. अंतरावर असणाऱया झायडस कॅडिला या कोरोना लस तयार करणाऱया कंपनीला पंतप्रधानांनी भेट दिली. कंपनीच्या वरि÷ अधिकाऱयांसोबत बैठक घेतली आणि कोरोनाच्या लसीच्या विकासाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी कंपनीच्या अधिकाऱयांना काही सूचनाही केल्या. झायडस कॅडिला ही कंपनी झायकोविड या लसीचे संशोधन करत आहे.
अहमदाबादमध्ये मोदींनी एक तासाहून जास्त वेळ घालवला. त्यानंतर ते हैदराबादच्या दिशेने रवाना झाले. हैदराबादमध्ये मोदी भारत बायोटेक या लस निर्मिती कंपनीला भेट देणार आहेत. ही कंपनी हैदराबादपासून 50 कि.मी. अंतरावर आहे. भारत बायोटेक, आयसीएमआर आणि एनआयव्ही संयुक्तपणे कोवॅक्सिन या लसीवर संशोधन करत आहे. भारत बायोटेकच्या या लसीच्या तिसऱया टप्प्यातील चाचण्या प्रगतीपथावर आहेत. आतापर्यंत 26 हजार स्वयंसेवकांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. टप्प्याटप्प्याने स्वयंसेवकांना लस दिली जात आहे. हैदराबाद भेटीनंतर पंतप्रधान मोदींनी पुण्यातील सिरम इन्स्टिटय़ूटला भेट दिली. यानंतर ते दिल्लीला रवाना झाले.
पंतप्रधानांच्या दौऱयामुळे आशा पल्लवित
तिन्ही कंपन्यांमधील लसीची सद्यस्थिती, त्याचे उत्पादन, वितरण व्यवस्था याचा आढावा पंतप्रधानांनी आपल्या भेटीदरम्यान घेतला. सरकारने या लसींच्या इमर्जन्सी ट्रायलला मंजुरी दिली तर ही लस भारतीयांना नव्या वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध होण्याची शक्मयता आहे. देशाच्या वेगवेगळय़ा भागात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचे रुग्ण वाढू लागले आहेत. सध्या तरी लस हाच या आजारातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे लस कधी येणार याकडे सगळय़ांचे लक्ष लागले आहे. त्यातच पंतप्रधानांनी घेतलेल्या आढाव्यामुळे भारतीयांच्या लसीसंबंधीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.









