ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरणाला वेग आला आहे. मात्र, देशात कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या 180 जणांचा 31 मार्चपर्यंत मृत्यू झाला असून, त्यामधील 75 टक्के मृत्यू लस घेतल्यानंतरच्या 3 दिवसातील आहेत.
केंद्र सरकारच्या लसीकरणविषयक समितीने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लस घेतल्यानंतर 2 आठवड्यात रक्ताच्या गुठळ्या आणि रक्तातील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे लस घेतल्यानंतरही 31 मार्चपर्यंत देशात 180 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामधील 75 टक्के मृत्यू हे लस घेतल्यानंतरच्या 3 दिवसातील आहेत.
केंद्र सरकारच्या लसीकरण विषयक समितीकडून दैनंदिन मृत्यूची नोंदणी केली जात असते. सरकारी संकेतस्थळावर केवळ 10 मृत्यूची नोंद असल्याने या आकडेवारीबाबत पारदर्शकता आणावी, अशी मागणी होत असल्याचे एका संकेतस्थळाने म्हटले आहे.









