ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
कोरोना प्रतिबंधक लस आली म्हणजे कोरोना संकट संपले असे नाही. जनतेच्या मनात कोरोना संपल्याची धारणा निर्माण होत आहे. मात्र, असे समजणे धोकादायक ठरू शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर जनरल टेड्रॉस अधनॉम घेबेरियस यांनी म्हटले आहे.
टेड्रॉस म्हणाले, काही ठिकाणी कोरोना आटोक्यात आला असला तरी काही देशात कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. तेथील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी तसेच प्रशासनावर दबाव वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट कायम आहे. कोणीही कोरोना संपल्याच्या भ्रमात राहू नये. योग्य ती काळजी घ्यावी.
जगभरात 51 लसींची मानवी चाचणी सुरू आहे. त्यामधील 13 लसी अंतिम टप्प्यात आहेत. याशिवाय 163 लसींची प्रयोगशाळेत निर्मिती सुरू आहे.









