केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निर्वाळा : जनसेवक मेळाव्याची सांगत
प्रतिनिधी / बेळगाव
केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्ये÷ नेते अमित शहा यांनी रविवारी दुपारी जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या जनसेवक मेळाव्याच्या समारोप समारंभात देशवासियांना वरील आवाहन केले आहे. संपूर्ण जगात भारताने कोरोनाच्या काळात अत्यंत व्यवस्थित व प्रभावीपणे परिस्थिती हाताळली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजनामुळे आपल्या देशात कमीत कमी कोरोना बळी गेले आहेत. कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या जगात अधिक आहे. कर्नाटकातही मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी यशस्वीरीत्या परिस्थिती हाताळल्याचे सांगून मुख्यमंत्री व राज्य सरकारचे कौतुक केले.
राष्ट्रीय-राज्य नेत्यांची उपस्थिती
जनसेवक मेळाव्याच्या सांगता समारंभात राष्ट्रीय आणि राज्यातील नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटिल, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, कर्नाटकाचे प्रभारी अरुण सिंग, सी. टी. रवी, उपमुख्यमंत्री गोविंद कार्जोळ, लक्ष्मण सवदी, उमेश कत्ती, बसवराज बोम्मई, जगदीश शेट्टर, पालकमंत्री रमेश जारकीहोळी, शशिकला जोल्ले, श्रीमंत पाटील, डॉ. डी. के. अरुणा, महेश टेंगिनकाई, प्रभू चव्हाण, खासदार अण्णासाहेब जोल्ले, रविकुमार, इराण्णा कडाडी, महांतेश कवटगीमठ, आनंद मामनी आदींसह राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक नेते उपस्थित होते.
क्षणचित्रे
- रविवारी सकाळी सांबरा विमानतळावर पालकमंत्री रमेश जारकीहोळी, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्यासह जिल्हय़ातील नेत्यांनी अमित शहा यांचे स्वागत केले.
- हेलिकॉप्टरने बागलकोट जिल्हय़ातील केरकलमट्टी येथील मुरुगेश निराणी यांच्या साखर कारखान्याच्या कार्यक्रमासाठी प्रस्थान.
- दुपारी हेलिकॉप्टरने सांबरा विमानतळावर आगमन. सर्किट हाऊसवर जेवणानंतर दिवंगत नेते सुरेश अंगडी यांच्या कुटुंबीयांची भेट.
- जनसेवक मेळाव्याच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर 1 लाखाहून अधिक कार्यकर्ते वेगवेगळय़ा वाहनांनी बेळगावात दाखल.
- गर्दीमुळे तब्बल 5 ते 6 किलोमीटर दूर वाहने उभी करून कार्यकर्त्यांना जिल्हा क्रीडांगणावर यावे लागले.
- नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्यांना भगवे फेटे बांधण्यात आले होते. कार्यक्रम स्थळावर पाण्याची पाकिटे वितरित करण्यात आली.
- अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक प्रताप रेड्डी हे स्वतः बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते. बंदोबस्तासाठी साडेतीन हजारहून अधिक पोलीस तैनात.
- बऱयाच कार्यकर्त्यांना क्रीडांगणावर प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे क्रीडांगणाबाहेर त्यांनी गर्दी केली होती.
- अमित शहा यांनी ‘भारत माता की जय’ अशी घोषणा देताच त्याला जोरदार प्रत्युत्तर मिळाले नाही. यावर ‘बेळगावकरांचा आवाज बसला आहे काय?’ असा टोमणा त्यांनी मारला.
- क्रीडांगणावर वारंवार मास्क परिधान करण्याची सूचना देत असतानाही याचे पालन करताना कार्यकर्ते दिसत नव्हते.