महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
देशभरातील 18 वर्षांवरील सर्वांचेच लसीकरण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केली आहे. 21 जूनपासून हे लसीकरण करण्यात येत आहे. मात्र बेळगाव तालुक्मयातील लसीकरणामध्ये गैरकारभार व राजकीय हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गावोगावी, गल्लोगल्ली राजकीय नेत्यांच्या नावानिशी अर्जांचे वाटप करून आपल्या मर्जीतील व्यक्तींना लसीकरण करण्यात येत आहे. तेंव्हा हा हस्तक्षेप थांबणे गरजेचे असून हा गैरप्रकार थांबवावा, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्धारे केली आहे.
बेळगाव जिह्यामध्ये लसीकरण एफएलडब्ल्युएल या निकषाखाली होत आहे. कोविशिल्डचे एकूण 11 हजार 408 जणांचे लसीकरण झाले. बेळगाव तालुक्मयातच 11 हजार 323 जणांचे लसीकरण झाले आहे. यावरून गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. तेंव्हा प्रशासनाने चौकशी करून जनतेच्या मनातील संभ्रम दूर करावा आणि कोविड लसीकरण मोहिमेमध्ये राजकीय हस्तक्षेप थांबवावा, अशी मागणी करण्यात आली.
ज्यांना 18 वर्षे झाली आहेत ते या लसीचे पात्र लाभार्थी आहेत. तेंव्हा सर्वांनाच लस उपलब्ध करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सुरज कुडुचकर, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सचिन केळवेकर, श्रीकांत कदम यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









