केरळ उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला विचारणा
तिरुअनंतपुरम
केरळ उच्च न्यायालयाने कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छायाचित्रावरून केंद सरकारला नोटीस बजावली आहे. कोट्टायमचे रहिवासी एम. पीटर यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय घेण्यात आला. कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींच्या छायाचित्रामुळे लोकांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे. अशा स्थितीत प्रमाणपत्रावरील पंतप्रधानांचे छायाचित्र हटविण्यात यावे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने अमेरिका, इंडोनेशिया, इस्रायल आणि जर्मनी समवेत विविध देशांचे लसीकरण प्रमाणपत्र सादर केले. या प्रमाणपत्रावर आवश्यक माहिती नमूद आहे, देशाच्या प्रमुखाचे छायाचित्र नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला.









