अमेरिकेच्या नागरिकांसाठी नवी मार्गदर्शक तत्वे
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
भारतात कोटय़वधी लोकांना घरातही मास्क वापरण्यास सांगण्यात येत असताना अमेरिकेत लसीचे दोन्ही डोस घेतलेले लोक मास्कशिवाय बाहेर पडू शकतात. अमेरिकेच्या डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन सेंटरकडून (सीडीसी) प्रसिद्ध नव्या मार्गदर्शक तत्वांमध्ये ही घोषणा करण्यात आली आहे. अमेरिकेतील सुमारे 40 टक्के प्रौढांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
मंगळवारी संध्याकाळी उशिरा प्रसारित नव्या मार्गदर्शक तत्वांमध्ये स्पष्टपणे कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना घरात तसेच घराबाहेर मास्क वापरण्याची गरज नसल्याचे म्हटले गेले आहे. लसीकरणाचे पूर्ण डोस घेणारे लोक आता घराबाहेर एकटय़ाने किंवा कुटुंबीयांसोबत जात असल्यास, दुचाकी किंवा पायी चालत जात असल्यास त्यांना मास्क वापरण्याची गरज नाही. पूर्ण लसीकरण करवून घेतलेल्या अन्य लोकांसोबत बंदिस्त स्टेडियम किंवा अन्य बंदिस्त ठिकाणीही मास्कशिवाय जाऊ शकतात.
याच्या अंतर्गत इनडोअर हालचालींमध्ये पूर्णपणे लसीकरण केलेल्या लोकांना हेयर सलूनमध्ये जाण्याची अनुमती देण्यात आली आहे. ज्या लोकांनी लसीचा डोस घेतला नाही अशा ते काही स्थिती वगळून मास्कशिवाय बाहेर पडू शकतात असेही म्हटले गेले आहे.
अमेरिकेत कोरोना महामारीमुळे आतापर्यंत 5 लाख 70 हजार लोकांना जीव गमवावा लागला आहे. लोकांनी 6 फुटांचे सोशल डिस्टन्सिंग राखावे असे सीडीसीकडून महामारीच्या प्रारंभापासून सांगण्यात येत आहे. तसेच संक्रमणापासून बचावासाठी मास्क वापरण्याची सूचना करण्यात आली होती.
दिशानिर्देशांच्या अंतर्गत लसीकरण न करविणाऱया लोकांना घराबाहेरील कार्यक्रमात मास्क वापरावा लागणार आहे. अशा स्थितीत लस न घेणारे अन्य लोकही असू शकतात. सीडीसीनुसार पूर्णपणे लसीकरण करवून घेतलेल्या लोकांना अशा स्थितीत चेहरा झाकून घेण्याची गरज नाही. पण गर्दी असलेल्या खुल्या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी मास्क वापरावा. लोक या सुचनांचा वापर वैयक्तिक जबाबदारी म्हणून करण्यासह स्वतःसह दुसऱयांचीही सुरक्षा करू शकतील असे उद्गार सीडीसीचे संचालक रॉशेल वालेंस्काइ यांनी काढले आहेत.









