सर्वात मोठय़ा लोकसंख्येला एकच वेळी लसीकरण करण्याचे शिवधनुष्य सरकारी यंत्रणेने लीलया पेलले. लस निर्मितीपासून लस टोचून घेण्यापर्यंत अनेक अडथळे पार करून लसीकरणाचा पहिला टप्पा यशस्वी झाला.
जगभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसीकरणात भारत 50 व्या क्रमांकावर असला तरीही मोठी लोकसंख्या असल्याकारणाने येथील लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यात महाराष्ट्र आणि मुंबईतील लसीकरणाकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. पेंद्राच्या निर्देशानुसार लसीकरण झालेही. कोरोना लढय़ात अर्थातच आरोग्य कर्मचाऱयांचे योगदान मोठे असल्याने त्यांना प्रथम लसीकरण करण्यात येणार आहे. नियोजित लसीकरण कार्यक्रम शनिवारी सुरुही झाला. कोव्हीशील्ड लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील लसीकरणाची सुरुवात पालिकेच्या कूपर रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन करून तर बीकेसी कोव्हीड लसीकरण पेंद्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लसीकरणाला सुरुवात झाली. यासाठी पालिकेकडून 500 कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले. दररोज 5 हजार जणांना लसीकरण करण्याचे उद्दिष्टय़ पालिकेने समोर ठेवले आहे. असे असले तरी मुंबईत शनिवारी 4 हजार टार्गेट ठरविण्यात आले होते. मात्र ऐनवेल तेवढय़ा जणांना लसीकरणाचा निरोप गेला नाही. त्यामुळे शनिवारी निव्वळ 1,923 जण लसीकरणाचे लाभार्थी ठरले. लसीकरणाच्या दिवसाअखेर या लाभार्थींकडून लसीकरणाउपरांत कोणत्याही तक्रारी आढळल्या नाहीत. मात्र उद्दिष्टाच्या तुलनेत लाभार्थी संख्या कमी आढळून आली. ही उणीव याठिकाणी नोंद होऊ शकते. कोरोना अद्याप संपलेला नसून लसीकरणाला प्रतिसाद देणे आवश्यक असल्याचे या पहिल्या दिवसाने धडा दिला, एवढे मात्र नक्की..
मुंबईतील 9 पेंद्रात रंगीत तालीम घेतल्यावर शनिवारी लसीकरण करण्यात आले. सकालच लसीकरण पेंद्रांबाहेर लाभार्थींच्या रांगा दिसून आल्या. लाभार्थींमध्ये चलबिचल वाढली असली तरीही ती तात्पुरती होती. तांत्रिक कारणाने आदल्या दिवशी आलेला मेसेज प्रवेशाच्या ठिकाणी तपासला जात होता. ओळखपत्र पाहिल्यानंतर टोकन दिले जात होते. नंतर लसीकरण कक्षात सोडण्यात आल्यावर लस दिली जात होती. या सोपस्कारानंतर निरीक्षण विभागात लाभार्थ्याला सोडण्यात येत होत. निरीक्षण विभागात खासगी तसेच सरकारी रुग्णालयातील कर्मचारी डॉक्टर होते. सायन रुग्णालयाचे डीन डॉ. मोहन जोशी यांना पहिले लसीकरण करण्यात आले. काही वेळच्या निरीक्षणानंतर डॉ. जोशी पुढील कामासाठी तत्पर झाले होते. लसीकरणाबाबत काही शंका सर्वांनाच होत्या, मात्र पेंद्रात समुपदेशनासाठी टीम तैनात होती. शिवाय लसीकरण उपरांतही काही त्रास उद्भवल्यास तज्ञ उपस्थित होते. त्यामुळे लसीकरणाबाबत कोणतीही तक्रार या ठिकाणी आढळून आली नाही. मुंबई व राज्यात मिळून पहिल्या लसीकरण टप्प्यात 18 हजार जण लाभार्थी झाले आहेत. यात लसीबाबत अद्याप तरी तक्रार नाही. त्यामुळे लसीकरणाला घाबरण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान मुंबईतील बऱयाच लाभार्थी आरोग्य कर्मचाऱयांनी लसीचा संदेश कोविन ऍपवरून न आल्याच्या तक्रारी मांडल्या. मात्र हा तांत्रिक मुद्दा असल्याचे त्या दिवशी उशिरा यंत्रणेच्या लक्षात आले. तांत्रिक अडचण लक्षात आल्यानंतर बऱयाच लाभार्थ्यांना व्हाट्सअप किंवा टेक्स्ट मेसेजद्वारे लसीकरणाबाबत कलविण्यात आले. मात्र लसीकरणाआधीची रात्र मेसेज न आल्याने तणावात गेल्याचे कर्मचाऱयांनी सांगितले. लाभार्थींच्या संपर्कासह सर्व माहिती कोविन ऍपमध्ये नमूद करण्यात आली आहे. ही माहिती आगामी कार्यक्रमासाठी आवश्यक ठरणारी आहे. ऍपमध्ये माहिती नमूद केल्याने कर्मचारी लसीकरणावाचून विन्मुख राहणार नाही. शिवाय लसीकरण टप्पे तो चुकवूही शकत नाही. लसीकरणाच्या आदल्या दिवशी येणारे मेसेज यंत्रणेला इतर माध्यमातून पाठवावे लागले. त्यामुळे लाभार्थ्यांना पहाटे 6 ते 7 दरम्यान मेसेज आले. मेसेज आल्यावर लसीकरण असल्याचे कळले. यात किंचित गोंधळ उडाला.
आपल्या देशात ऍपद्वारे लसीकरणाची पहिलीच वेळ असून यापूर्वी मनुष्यबळ वापरून लसीकरणाची नोंद करण्याची पद्धत होती. अनेक तज्ञांनी वीज पुरवठा थांबल्यास लसीकरण कसे होणार असा प्रश्न उपस्थित केला. हा प्रश्न ग्राह्य धरून सरकारी यंत्रणेने त्याच समस्येकडे लक्ष पेंद्रित केले. मात्र ऍपमध्ये समस्या झाल्यास काय याकडे दुर्लक्ष झाल्याची टीका सध्या सुरू आहे. कोविन ऍप हे सॉफ्टवेअर असून पेंद्राकडून तयार करण्यात आले. शुक्रवारी संध्याकाल यामध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनात आले. मुंबईसह राज्यभरातून ठिकठिकाणी मेसेज न जाण्याच्या तक्रारी येऊ लागल्या. अशी ऍप सॉफ्टवेअरवर चालत असल्याने या ऍपची रंगीत तालम घेणे आवश्यक होते. लसीकरणापूर्वीची घेण्यात आलेली ड्राय रन कर्मचारी नोंद पेंद्रित होती. यात ऍप ज्याप्रमाणे काम करते याकडे दुर्लक्ष झाले का अशी विचारणा सध्या होत आहे. या ऍपने चांगल्या पद्धतीने काम करावे असेच सर्वांना वाटत आहे. बहुतांश सरकारी ऍप किंवा
सॉफ्टवेअरचे काम खासगी कंपन्यांना देण्यात येतात, असे असल्यास त्या खासगी कंपन्यांवर सरकारी यंत्रणेचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. मध्यंतरी आरोग्य सेतू ऍपबाबतही तक्रारी होत होत्या. हे ऍप बऱयाच लोकांनी डिलिट केल्याचे सांगितले जाते. सुरुवातीच्या टप्प्यातच
सॉफ्टवेअरमध्ये अडथळे येत असल्यास लसीकरणाचे भवितव्य काय अशी शंका उपस्थित होते. एकंदरीत लसीकरणाबाबत शंका उपस्थित करून लसीकरण टाळण्यासाठी बहुतेक जण तयारीत आहेत. त्यात अशा तांत्रिक अडथळय़ांना वाव मिळाल्यास लसीकरणही ढेपाळेल की काय अशी शंका निर्माण होत आहे. सर्वसामान्यांना ही लस मोफत देण्याचा निर्णय सरकार घेण्याच्या तयारीत असताना एखाद्या यंत्राने सर्वसामान्यांच्या जीवन जगण्याच्या आशेवर पाणी फिरू नये असे तूर्तास म्हणावे लागेल. आता कोरोनाचा हत्ती गेला असताना शेपूट उरले आहे. या निकराच्या लढाईत जगण्याची उमेद देताना प्रत्येक टप्प्यावर विश्वास निर्माण करावा लागणार आहे.
राम खांदारे








