अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार 17 डिसेंबर 2021, सकाळी 11.30
● ऊसतोड मजुरांना लसीकरण सक्तीचे
● तालुकानिहाय पथकांकडून मजुरांचे लसीकरण
● डिसेंबरच्या पंधरवड्यात लसीकरणाचा वेग वाढला
● जिल्ह्यात नव्याने वाढले 34 रूग्ण
● 3399 संशयितांच्या चाचण्या
सातारा / प्रतिनिधी :
डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील लसीकरणाचा महत्वकांक्षी टप्पा पुर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात सध्या रूग्णवाढ आटोक्यात असून शुक्रवारी आलेल्या अहवालात जिल्ह्यात 34 कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे. रूग्णसंख्या आटोक्यात असल्याने जिल्हा प्रशासन लसीकरणात व्यस्त झाले आहे. या मोहिमे अंतर्गत आता परजिल्ह्यातून आलेल्या ऊसतोड मजुरांचे लसीकरण करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढला आहे.
15 दिवसात 3 लाख 4 हजार नागरिकांना दुसरा डोस
डिसेंबर महिन्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यात प्रशासन यशस्वी ठरले आहे. डिसेंबर महिन्याच्या 15 दिवसात जिल्ह्यात 3 लाख 4 हजार 678 नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतल्याची नोंद झाली आहे. 1 डिसेंबर रोजी 5 हजार 223 नागरिकांनी पहिला तर 16 हजार 729 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 2 डिसेंबर रोजी 5 हजार 567 नागरिकांनी पहिला तर 23 हजार 256 दुसरा डोस, 3 डिसेंबर रोजी 3 डिसेंबर 6 हजार 659 नागरिकांनी पहिला तर 28 हजार 605 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 4 डिसेंबर रोजी 5 हजार 457 नागरिकांनी पहिला तर 20 हजार 546 जणांनी दुसरा, 5 डिसेंबर रोजी 14 हजार नागरिकांनी पहिला तर 5 हजार 654 दुसरा, 6 डिसेंबर रोजी 7 हजार 620 नागरिकांनी पहिला तर 27 हजार 569 दुसरा, 7 डिसेंबर रोजी 6 हजार 664 नागरिकांनी पहिला तर 22 हजार 533 दुसरा डोस घेतला आहे.
दुसरा डोस घेणारांची संख्या वाढतेय
डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ज्या प्रमाणे लसीचा वेग वाढला तोच वेग दुसरया आठवड्यातही कायम राहिला. 8 डिसेंबर रोजी 6 हजार 65 नागरिकांनी पहिला तर 22 हजार 689 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 9 डिसेंबर रोजी 4 हजार 854 नागरिकांनी पहिला तर 19 हजार 570 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 10 डिसेंबर रोजी 2 हजार 552 नागरिकांनी पहिला डोस तर 10 हजार 767 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
गुरूवारी जिल्हय़ात
नमुने-3399
बाधित-34
मृत्यू-00, उशिरा नोंद -2
उपचारार्थ-242
मुक्त-11
गुरूवारपर्यंत जिल्हय़ात
नमुने-23,40,681
बाधित-2,52,201
मृत्यू-6,487
मुक्त-2,44,758