जिह्यात 17 नवे रुग्ण, सक्रिय रुग्णांची संख्या घटली
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनावरील लसीकरणासाठी शुक्रवारी 8 जानेवारी रोजी जिह्यात पुन्हा रंगीत तालीम करण्यात येणार असून सात ठिकाणी ड्रायरण होणार आहे. दरम्यान गुरूवारी 17 नवे रुग्ण आढळून आले असून बेळगाव तालुक्मयातील सहा जणांचा समावेश आहे.
उपलब्ध माहितीनुसार केएलई संस्थेचे डॉ. जवाहरलाल नेहरु वैद्यकीय महाद्यालय, बिम्स् या दोन वैद्यकीय महाविद्यालयांबरोबरच बेळगाव शहर, गोकाक, अथणी तालुक्मयातील वेगवेगळी प्राथमिक आरोग्य केंदे व खासगी इस्पितळात लसीकरणाची रंगीत तालीम होणार आहे.
दरम्यान गुरूवारी जिह्यात 17 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये चार शिक्षकांचा समावेश आहे. हुलीकट्टी, कपिलेश्वर कॉलनी, उद्यमबाग, शिवबसवनगर, ताशिलदार गल्ली, भाग्यनगर, कागवाड, अंबडगट्टी, सदलगा, मल्लापूर पी.जी., अंकलगी, गोकाक, सौंदत्ती, नेसर्गी, हट्टीहोळी परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
गोकाक तालुक्मयातील अंकलगी येथे तीन शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण बाधितांची संख्या 26 हजार 353 वर पोहोचली असून त्यापैकी 25 हजार 854 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 156 सक्रिय रुग्ण आहेत. अद्याप 6 हजार 959 जणांचा अहवाल यायचा आहे.









