नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
परराष्ट्र मंत्री एस .जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या एका उच्चस्तरीय बैठकीला संबोधित केलं. यावेळी त्यांनी दहशतवादी कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच दहशतवादाच्या मुद्यावर त्यांनी पाकिस्तानवर टीका केली.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ‘आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला धोका’ या विषयावर उच्चस्तरीय बैठकीला जयशंकर यांनी संबोधित केले. आमच्या शेजारच्या भागात, इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हेंट – खोरासन अधिक शक्तिशाली बनले आहे आणि सतत आपल्या दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाणिस्तानमधील घडामोडींमुळे प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेबाबत जागतिक चिंता वाढल्या आहेत. ते अफगाणिस्तानात असोत किंवा भारताच्या विरोधात असो, लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद सारख्या गटांना त्यांचा पाठिंबा आहे आणि ते निर्भयपणे आपले उपक्रम राबवत आहेत, असे जयशंकर यांनी म्हटले.
दहशतवादी कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षेला असलेला धोका या विषयावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील (यूएनएससी) चर्चासत्रात बोलताना एस. जयशंकर यांनी भारताची भूमिका ठामपणे मांडली. लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महम्मद या संघटना भारतासारख्या देशांविरोधात मोकाट कारवाया करत असतात. या संघटनांचे आदरातिथ्य केले जाते आणि त्यांना प्रोत्साहनही दिले जाते, असे जयशंकर म्हणाले.
Previous Articleसुळगे (ये.) गायरान जागा गावासाठी राखीव ठेवा
Next Article सार्वजनिक गणेशोत्सवाला तहसीलदारांनी परवानगी द्यावी









