वृत्तसंस्था/ चेन्नई
उत्तराखंड येथे शनिवारी झालेल्या 31 व्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेचे विजेतेपद तामिळनाडूच्या 27 वर्षीय भवानी देवीने पटकाविले. येत्या जुलैमध्ये होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी तलवारबाजी या प्रकारात पात्र ठरणारी भवानी देवी ही भारताची पहिली महिला तलवारबाज आहे.
समशेरबाजीत सेबर या प्रकारातील अंतिम लढतीत भवानी देवीने केरळच्या ज्योत्स्ना जोसेफचा 15-7 असा पराभव करत राष्ट्रीय विजेतेपद पटकाविले. भवानी देवीने उपांत्य फेरीत के. अनिताचा 15-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. या स्पर्धेत पहिल्या सामन्यात भवानी देवीने जम्मू-काश्मीरच्या जसप्रित कौरचा 15-2 त्यानंतर दुसऱया सामन्यात तेलंगणाच्या बेबी रेड्डीचा 15-14 तसेच उपांत्यपूर्व फेरीत पंजाबच्या कौरचा 15-7 असा पराभव पेला.
पुरूषांच्या विभागात सेनादलाच्या कुमारसेन पद्म गिशो निधीने राष्ट्रीय विजेतेपद मिळविताना राजस्थानच्या विद्यमान विजेत्या कर्ण सिंगचा पराभव केला. समशेरबाजी सेबर वैयक्तिक गटातील जेतेपद कुमारसेनने मिळविले. केरळच्या अवंती राधिका प्रकाशने महिलांच्या फॉईल वैयक्तिक समशेरबाजी प्रकारातील जेतेपद स्वतःकडे राखताना मणिपूरच्या खुशबु राणीचा पराभव केला.