नवी दिल्ली :
शाओमी कंपनीचा दहाव्या आवृत्तीसोबत इंटेल कोर आय 3 प्रोसेसरसह एमआय नोटबुक-14 लवकरच भारतात सादर केले जाणार आहे. यासंदर्भात सविस्तर माहिती शाओमी इंडियाचे जागतिक पातळीवरील अध्यक्ष मनु कुमार जैन यांनी सोशल मीडियाला दिली आहे. सदरचे इंटेल हे 10 वी आवृत्ती कोर आय 5 आणि कोर आय 7 प्रोसेसरसाबत येत आहे. एमआय नोटबुक 14 ही आवृत्ती येत्या काही दिवसांमध्ये देशात दाखल होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
? नवीन एमआय नोटबुक 14 मॉडेलमध्ये एक इन बिल्ट वेबकॅम
? कोर आय 5 पावर्डची क्षमता.
? एक 256 जीबी स्टोरेज कॉन्फिग्रेशन मॉडेलचा समावेश राहणार
? सदर लॅपटॉपचे वजन हे 1.5 किलो राहण्याचे संकेत आहेत.









