वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
समाजमाध्यमाचे वापरकर्ते लवकरच भारतीय ‘व्हॉट्सऍप’द्वारे परस्परांशी चॅट करताना दिसून येतील. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी भारतीय व्हॉट्सअीप निर्मितीचे काम सुरू असल्याची घोषणा केली आहे. नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर (एनआयसी) आणि सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (सीडीओटी) मिळून या ऍपची निर्मिती करत आहेत.
जूम या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ऍपसाठी देशातच पर्याय निर्माण करण्यासाठी दूरसंचार क्षेत्रात कार्यरत कंपन्या प्रयत्नशील आहेत. तर आरोग्य सेतूमधून डाटा लीक होण्याची शक्यता नसून हे ऍप पूर्णपणे सुरक्षित आहे. हे ऍप केवळ लोकांना सतर्क करण्याचे काम करत असल्याचे प्रसाद म्हणाले.
भारतात 9.5 कोटी लोकांनी हे ऍप डाउनलोड केले आहे. या ऍपमध्ये कुणाचेच नाव दिसून येत नाही. ऍपमधील पूर्ण डाटा इनक्रिप्टेड असतो. सर्वसाधारण डाटा 30 दिवसांत आपोआप नष्ट होतो. तर कोरोनाबाधिताचा डाटा 45 ते 60 दिवसांमध्ये नष्ट होणार आहे.
या ऍपमध्ये सुधारणा करण्याची शक्यता असल्यास तज्ञाने सूचना करावी. आरोग्य सेतू ऍपच्या डाउनलोडला कायदा आणि खासगीत्वाच्या जाळय़ात गुंतविडो चुकीचे आहे. जगातील अनेक देश अशाप्रकारच्या व्यासपीठांचा वापर करत आहेत. तेथे कुणीच अशाप्रकारचा प्रश्न उपस्थित करत नसल्याचे प्रसाद म्हणाले.
भारतीय पोस्ट विभागाने टाळेबंदीच्या काळात 700 टन औषधे देशभरात पोहोचविली आहेत. याचबरोबर दुर्गम क्षेत्रांमध्ये आधारयुक्त पेमेंट सेवेद्वारे पोस्ट विभागाने 900 कोटी रुपयांचे लोकांना वाटप केले आहे. तसेच औषधे पोहोचविण्यासाठीही पोस्ट विभागाला विशेष निर्देश देण्यात आल्याचे प्रसाद म्हणाले.
.
.









