ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा लवकरच अंत होईल, अशी धमकी इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांनी दिली आहे.
अमेरिकेने मागील वर्षी इराणवर ड्रोन हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणच्या कुड्स दलातील वरिष्ठ अधिकारी कासीम सुलेमानी यांची हत्या झाली. हा हत्येचा बदला रक्तपाताने घेतला जाईल, अशी धमकी रुहानी यांनी दोन दिवसांपूर्वी इराणी मंत्रिमंडळासमोर केलेल्या भाषणात दिली.
रुहानी यांच्या अधिकृत संकेतस्थळावर हे भाषण पोस्ट करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सुलेमानी यांच्यावर हल्ला करणाऱ्या ट्रम्पशाहीचा लवकरच अंत होईल. त्यानंतर तो गुन्हेगार इतिहासजमा होईल. सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.









