प्रतिनिधी / म्हापसा
आमदार जयेश साळगावकर मंत्री मंडळात असताना साळगाव कचरा प्रकल्प विस्ताराला मंत्री मंडळात मंजुरी दिली आहे हे आमदारांनी साळगाव वासियांना का सांगितले नाही. साळगाव वासियांनी त्यांना निवडून दिले होते. ती फाईल मंत्री मंडळात आल्यावर त्यांनी त्यास विरोध करायला पाहिजे होता तो का केला नाही. मतदार कोमुनिदाद पंचायत मंडळाला विश्वासात घेऊन का सांगितले नाही. आमदारांनी लपाछपी न करता सत्य काय ते लोकांपुढे आणावे. 2019 साली या विस्तारीकरणाला मंत्री मंडळाने मंजुरी दिली आहे. अशी माहिती माजी आमदार दिलीप परुळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलताना परुळेकर म्हणाले की, साळगाव कचरा प्रकल्प आहे तो 2014 साली 100 टनचा यावा म्हणून कळंगूट साळगाव कोमुनिदाद व सहा पंचायती मिळून 100 टनचा कळंगूट व साळगाव प्रकल्प उभारण्यात आला अन्य विस्तारीकरण होणार नाही. असे ठरविण्यात आले. येथील सर्व कचरा झाकण्यात येईल असे सांगण्यात आले होते.
आता या प्रकल्पाला विस्तारीकरणाला मान्यता देण्यात आली आहे. साळगाव व कळंगुटसाठी 250 टनचा कचरा पाहिजे की सर्व राज्यातील कचरा येथे आणायचा आहे. याचा विचार करण्याची वेळ आता साळगाव वासियांवर आली आहे.
जर मत्री मंडळात 100 वरून 250 ला विस्तारीकरण करण्यास परवानगी दिली त्यावेळी मंत्री मंडळात आमदार जयेश साळागवकर मंत्री होते. त्यांनी त्यावेळी पंचायत, कोमुनिदादला विश्वासात घेतले काय. याला उत्तर आहे काय. आमदाराने मंत्री मंडळात असताना याची माहिती नागरिकांना का दिली नाही. ही फाईल मंत्री मंडळात आली तेव्हा विरोध करायला पाहिजे होता. तसे न करता आता आमदार जयेश साळगावकर नाटक करीत आहे त्यांनी सत्य लोकांसमोर आणायला पाहिजे. 2019 च्या मंत्री मंडळात या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे. साळगाव भाजपच्या वतीने आपण कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्र्यांना याबाबत लेखी निवेदन दिले आहे. गेल्या वर्षी 14 जुलै रोजी आजच्या दिवशीच साळगावकरांना मंत्री मंडळातून डच्चू देण्यात आले होते. याचे कारणही साळगावकरांची अशी ही खोटारडेपणा असू शकेल. प्रकल्प विस्तारीकरण प्रकरण माहित असूनही त्यावेळी आमदार साळगावकरांनी ग्रामसभा का बोलावली नाही असा प्रश्न माजी आमदार दिलीप परुळेकर यांनी केला.









