बॉलिवूड अभिनेत्री तसंच मालिकांमधले कलाकार तंदुरुस्तीची विशेष काळजी घेत असतात. त्यांच्याकडे बघून त्यांच्या वयाचा अंदाज लावता येत नाही. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये प्रमुख भूमिकेत दिसलेल्या लता सभरवालबद्दलही असंच म्हणता येईल. लता 45 वर्षांची आहे. मात्र ती खूप तरुण दिसते. तिची त्वचाही खूप मुलायम आणि नितळ आहे. आपलं सौंदर्य जपण्यासाठी लता नेमकं काय करते? जाणून घेऊ.
- लता फिटनेससाठी माउंटन क्लाईंबर हा व्यायाम करते. तिने हा व्यायाम करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. माउंटन क्लाईंबर हा माझा आवडीचा व्यायामप्रकार असल्याचं तिने म्हटलं आहे. या व्यायामामुळे वजन कमी व्हायला मदत होते. तसंच स्नायू बळकट होतात.
- लता सीट अप्सही करते. हा व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे. या व्यायामामुळे पोटाचे स्नायू बळकट होतात.
- पाठीच्या कण्याला बळकटी देण्यासाठी ती सुपरमॅन पोझ करते. या व्यायामामुळे तुम्ही अधिक काळ तरुण दिसता तसंच तंदुरुस्तही राहता.









