तरुण भारत ऑनलईन टीम
लता मंगेशकर गेल्या अनेक त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल असून त्यांच्या प्रकृतीत आटा सुधारणा होत आहे. मंगेशकर कुटुंबियांनी दीदींच्या ट्विटर हँडलवरून त्यांच्या प्रकृतीची माहिती दिलीआहे. लता मंगेशकर अजूनही अतीदक्षता विभागात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
त्यांच्या ट्विटर हँडलवरून सांगण्यात आलेआहे कि , ‘लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या अजूनही आयसीयूमध्ये दाखल आहे. आज सकाळी त्यांना व्हेंटिलेटर काढून त्यांची चाचणी घेण्यात आली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत मात्र तरीही त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. तुमच्या सर्व चाहत्यांच्या प्रार्थना आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद.’ लतादीदींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी,यासाठी देवाकडे प्रार्थना करा,असे आवाहनही मंगेशकर कुटुंबाने केले आहे.