ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पेगासस हेरगिरी प्रकरणातील वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गुरुवारी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांना मंजुरी दिली. त्याअंतर्गत केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये 750 कोटी रुपये खर्चून केंद्रीय विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे. हे विद्यापीठ तेथील इतर शैक्षणिक संस्थांचे मॉडेल म्हणूनही काम करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.
ते म्हणाले, या व्यतिरिक्त केंद्रीय मंत्रिमंडळाने लडाख केंद्र शासित प्रदेशात लडाख इंटिग्रेटेड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (लिडको) स्थापनेस मान्यता देखील दिली आहे.
या प्रकल्पांतर्गत एकात्मिक बहुउद्देशीय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. पर्यटन, उद्योग, वाहतूक सुविधांचा विकास आणि स्थानिक उत्पादने व हस्तकलेचे विपणन यासारख्या लडाखमध्ये ही महामंडळ यासारखी महत्त्वपूर्ण कामे आणि पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.
यासह सरकारने येत्या 5 वर्षात 6,322 कोटी रुपये खर्च करून स्पेशालिटी स्टील साठी उत्पादन लिंक्ड प्रोत्साहन योजनेस मंजुरी दिली आहे. या योजनेमुळे उत्पादन वाढेल तसेच 5.25 रोजगार उपलब्ध होणार आहे.