ऑनलाईन टीम / जम्मू :
लडाखमध्ये गुरुवारी सकाळी 9 वाजून 22 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे.
याआधी बुधवारी देखील मणिपूरमधील उखरुलमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टल स्केल एवढी होती.