ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लडाखसारख्या बर्फाळ प्रदेशात तैनात असलेल्या जवानांचे थंडीपासून रक्षण व्हावे, यासाठी लडाखमधील समाजसेवक सोनम वांगचुक यांनी खास सौरतंबू तयार केला आहे. वांगचुक यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.
उणे तापमानात लडाखमधील जवानांना प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागतो. अशा वेळी जवान शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी केरोसीन हिटर वापरतात. मात्र, त्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी वांगचूक यांनी हा विशेष सौरतंबू तयार केला आहे. या सौरतंबूत तापमान 15 ते 20 अंश सेल्सिअस राहील. त्यामुळे बाहेरचे तापमान जरी उणे असले तरी तंबूत जवानांचा थंडीपासून बचाव होईल.
हा तंबू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फोल्ड करून नेता येतो. त्याचे वजन 30 किलो आहे. या तंबूत एकावेळी 10 जवान विश्रांती घेऊ शकतात.