वै विध्य खाण्याची हौस पुरवायची असेल तर जर्दा पुलाव हा त्याला सर्वोत्तम पर्याय आहे. वेगळी चव म्हणून हा पुलाव करून बघायला हरकत नाही.
साहित्य– एक वाटी बासमती तांदूळ, अर्धा वाटी साखर, 3-4 लवंग, एक तमालपत्र, एक टेबलस्पून तूप, दोन टेबलस्पून खाण्याचा केशरी रंग, अर्धा टी स्पून बदामाचे तुकडे, एक टी स्पून भिजवलेले पिस्ते बारीक काप करून, एक टी स्पून वेलची पावडर,पाणी अडीच कप, सजावटीसाठी केशर
कृती- एका जाळीदार भांडय़ामध्ये बासमती तांदूळ धुवून घ्या. संपुर्ण पाणी निथळल्यानंतर ते तांदूळ एका बाऊलमध्ये काढून घ्या. तांदूळ जेमेतेम बुडतील अशा प्रमाणात बाऊलमध्ये पाणी घाला. त्यात तमालपत्र आणि लवंग थोडसं परतून घ्या. त्यानंतर त्यात दीड कप पाणी घाला. पाणी कोमट झालं की भिजवत ठेवेलेले तांदूळ पॅनमध्ये टाका. आता खाण्याचा केशरी रंग टाका. हा रंग एकजीव होईपर्यंत मिश्रण ढवळत रहा. यानंतर पॅनवर झाकण ठेवा. काही काळ वाफवू द्या. थोडावेळ वाफवलेल्या भातात साखर घाला. साखर विरघळताना पुन्हा झाकण लावून शिजवा. काही वेळाने यात वेलची पावडर, बदाम आणि पिस्त्याचे काप टाकून मिक्स करून घ्या. यानंतर वाफवून घ्या आणि गरमागरम सर्व्ह करा.









