वधू-वर सूचक केंद्र चालकांची दादागिरी, महिलेसह दोघांवर गुन्हा
प्रतिनिधी/मिरज
तालुक्यातील विजयनगर येथे लग्नासाठी मुलगी पाहण्यास आलेल्या तरुणाला वधू-वर केंद्र चालकांनी काठीने मारहाण केली. मुलगी पहायच्या आधी पैसे भरावे, असे म्हणून वधू-वर केंद्र चालकाने दादागिरी करून हाकलून लावले. यामुळे संतप्त झालेल्या तरुणाने ग्रामीण पोलिसात धाव घेऊन वधू-वर सूचक केंद्रातील महिलेसह दोघांविरुद्ध तक्रार दिली आहे.
तरुणाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी मीना तुकाराम काळे (रा. सुभाषनगर, हुळळे प्लॉट) आणि रवी शंकर नकाते (रा.मिरज) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सदर दोघांनी मारहाण करून पळ काढला आहे.
मिरजेतील नदिवेस येथे राहणाऱ्या एका 32 वर्षीय तरुणाने लग्नासाठी मुलगी हवी आहे, म्हणून मीना तुकाराम काळे या महिलेच्या वधू-वर सूचक केंद्रात नोंदणी केली होती. सदर वधू-वर सूचक केंद्राचे कार्यालय विजयनगर येथे असून, मीना आणि रवी हे दोघे स्थळ शोधत असतात. त्यांनी या तरुणाच्या विवाहासाठी निपाणी येथे एक मुलगी असून, ते स्थळ तुम्हाला दाखवितो असे सांगितले होते. त्यानुसार सदर तरुणाला विजयनगर येथे बोलावून घेण्यात आले.
पण, निपाणी येथे मुलगी पाहण्यास जाण्याच्या आधी वधू-वर केंद्रात पैसे भरण्यासाठी सांगितले. मात्र, सदर तरुणाने पैसे देण्यास नकार दिल्याने वधू-वर केंद्र चालक असणाऱ्या मीना काळे आणि रवी नकाते या दोघांनी अश्लील शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. तसेच पैसे नसतील तर लग्न कशाला करायला आलास, असे म्हणून हाकलून लावले. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








