ऑनलाइन टीम / पुणे :
मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर आज, शिवसेनेला पहिला धक्का बसला आहे. शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी मंत्रीपद न मिळाल्याने राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. पुण्यातील भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी सत्तार यांच्या राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, ‘लग्नासाठी बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव मंडपातून पळून गेला’ असं म्हणत बापट म्हणाले. अजून पर्यंत मुख्यमंत्र्यांनी खातेवाटप केलेले नाही. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा का दिला हे माहीत नाही. लग्नासाठी बोहल्यावर चढण्यापूर्वीच नवरदेव मंडपातून पळून गेला अशी स्थिती झाली आहे, असं गिरीश बापट यांनी म्हटलं आहे.