चांदोर येथील महिलेकडून तक्रार, संशयिताविरूद्ध गुन्हा दाखल
प्रतिनिधी/ रत्नागिरी
सरकारी नोकर असल्याचे सांगून तालुक्यातील चांदोर येथील महिलेला लग्नाचे आमिष दाखवत 12 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आह़े याप्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार मधुकर दोरकर या संशयिताविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार गायत्री चांदोरकर व मधुकर दोरकर यांची 6 महिन्यांपूर्वी ओळख झाली होत़ी यावेळी मधुकर याने आपण सरकारी नोकरीत मोठय़ा पदावर असल्याची बतावणी गायत्री यांच्याजवळ केली होत़ी ओळख वाढल्यानंतर मधुकर याने गायत्रीहीला लग्नाचे आमिष दाखविल़े सरकारी नोकरीचा विचार करून गायत्री हिने देखील लग्नाला होकार दिला होत़ा
गायत्री हिचा होकार मिळताच मधुकर याने तिला संसाराची स्वप्न दाखविण्यास सुरूवात केल़ी प्रेमाच्या आणा-भाका गायत्रीपुढे घेवून तिचा विश्वास संपादन केला. आपल्याला जमीन घेवून घर बांधायचे आहे, तसेच गाडीही घ्यायची असल्याचे मधुकरने गायत्रीला सांगितले. त्यासाठी त्याने गायत्रीकडे पैशाची मागणी केल़ी आपल्याच सुखी संसारासाठीच हे चालले आहे असे समजून गायत्रीने पैसे देण्याचे कबुल केले. रत्नागिरी शहरात विविध ठिकाणी भेटून गायत्रीने 3 फेबुवारी ते 31 जुलै दरम्यान चेक व रोख स्वरूपात 12 लाख 5 हजार 500 रूपये दोरकर याला दिल़े
पैसे मिळाल्यातंर दोरकरने गायत्रीशी संपर्क तोडण्याचा प्रयत्न केल़ा त्यानंतर आपली फसवणूक झाली आहे, लग्नाचे आमिष केवळ पैशाच्या लोभासाठी होते हे लक्षात येताच गायत्रीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल़ी याप्रकरणी पोलिसांनी दोरकर याच्याविरूद्ध शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 420 नुसार गुन्हा दाखल केला आह़े पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक पाटील करत आहेत़









