प्रतिनिधी / इचलकरंजी
लग्न झाल्याचे लपवून फेसबुकवरून ओळख वाढवून लग्नाच्या आमिषाने इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवून त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी पीडित महिलेस दिली. याप्रकरणी राहुल दीपक परीट (रा. दत्त कॉलनी, कागल) यांच्याविरोधात गावभाग पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. संशयित परीट हा कोल्हापूर जिह्यात पोलीस सेवेत कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पीडित महिला ही इचलकरंजीतील रहिवासी आहे. संशयित परीट याने फेसबुकवर ओळख निर्माण केली. त्यातून प्रेमसंबंध वाढवून लग्नाचे आमिष दाखवून उचगाव येथील राही लॉज येथे जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. तसेच फोटो काढून घरी, मित्रमैत्रिणी व सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली.तसेच इचलकरंजी येथील चेतना लॉज व जयसिंगपूर येथे बोलावून लग्नाच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या असेही पीडित महिलेने म्हटले आहे.









