ऑनलाईन टीम / लखनऊ :
लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा हा मुख्य आरोपी आहे. एसआयटीने आज या प्रकरणात 5000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आरोपपत्रात आशिष मिश्रा याच्यासह 14 आरोपींची नावे आहेत.
3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर खेरीतील टिकुनिया शहरात झालेल्या हिंसाचारात चार शेतकरी आणि एका पत्रकारासह आठ जण ठार झाले होते. त्याच तारखेला रात्री एफआयआर दाखल करण्यात आला होता. ज्यात 14 जणांची नावे आरोपी म्हणून ठेवण्यात आली होती. दरम्यान, आतापर्यंत या प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. एसआयटी चौकशी अधिकारी प्रदीप कुमार यांनी ही घटना जाणीवपूर्वक आणि कट रचून घडवून आणल्याचे म्हटले आहे.
या प्रकरणात आशिष मिश्रा तसेच त्याचा मेहुणा वीरेंद्र शुक्ला यांचेही आरोपपत्रात नाव आहे. पुरावा लपवल्याचा आरोप त्याच्यावर आहे.









