ओनलाईन टीम/तरुण भारत
लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील (lakhimpur kheri violence) प्रमुख आरोपी आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (union minister ajay mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा सध्या अटकेत आहे. दरम्यान, आशिष मिश्राला (ashish mishra) पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. यापूर्वी तो न्यायालयीन कोठडीत होता. आता त्याला डेंग्युची (dengue) लागण झाल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डेंग्युचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तपास समितीने पोलिस कस्टडी रिमांडमधून आशिष मिश्राला पुन्हा जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे.
जिल्हा सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी आशिष मिश्रा याच्यासह चार आरोपींना शुक्रवारी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं. या सर्वांची दोन दिवसांची पोलीस कोठडी रविवारी पाच वाजता संपणार आहे. ९ ऑक्टोबर रोजी आशिष मिश्राला अटक करण्यात आली होती. लखीमपूर खिरी जिल्ह्यातील तिकुनिया इथं तीन ऑक्टोबरला झालेल्या हिंसाचारात ४ शेतकऱ्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला होता. यावेळी आशिष मिश्राने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चालवली असा आरोप आंदोलक शेतकऱ्यांनी केला आहे.
लखीमपूर हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत आशिष मिश्रा याच्यासह १३ आरोपींना अटक कऱण्यात आली आहे. लखीमपूरमध्ये उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या दौऱ्याविरोधात तीन ऑक्टोबरला आंदोलन केलं होतं. तेव्हा लखीमपूरमध्ये एका एसयुव्ही कारने चार शेतकऱ्यांना चिरडले होते. यानंतर संतप्त झालेल्या आंदोलकांनी भाजपच्या दोन कार्यकर्त्यांसह एका ड्रायव्हरची हत्या केली होती.









