नवी दिल्ली/प्रतिनिधी
लखीमपूर खेरी प्रकरणाची चौकशी करणाऱया विशेष तपास पथकाची (एसआयटी) सर्वोच्च न्यायालयाने पुनर्रचना केली आहे. तपासात पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश राकेश कुमार जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच एस. बी. शिरोडकर, दीपिंदर सिंग आणि पद्मजा चौहान या तीन वरि÷ आयपीएस अधिकाऱयांच्या नावांचा नव्या एसआयटीमध्ये समावेश आहे. आरोपपत्र दाखल केल्यानंतर आणि निवृत्त न्यायाधीशांच्या अहवालानंतर न्यायालय आता या प्रकरणाची नव्याने सुनावणी करणार आहे.









