वृत्तसंस्था/लंडन
रविवारी येथे झालेल्या लंडन मॅरेथॉनमध्ये केनियाच्या जॉयसिलिन जेपकोसगेईने महिला विभागातील तर इथिओपियाच्या सिसे लिमाने पुरूष विभागातील अजिंक्यपद पटकाविले. कोरोना महामारी समस्येनंतर लंडन मॅरेथॉन स्पर्धेला येथे प्रचंड प्रतिसाद लाभला.
केनियाची महिला धावपटू जेपकोसगेईने अलिकडेच सलग तीन वेळा लंडन मरेथॉन स्पर्धा जिंकली आहे. रविवारी जेपकोसगेईने दोन तास, 17 मिनिटे आणि 43 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थान मिळविले. इथिओपियाच्या अझिमेरवॉने दोन तास, 17 मिनिटे आणि 18 सेकंदाचा अवधी घेत दुसरे तसेच इथिओपियाच्या बेकेरीने तिसरे स्थान मिळविताना दोन तास, 18 मिनिटे आणि 18 सेकंदाचा अवधी घेतला.
पुरूषांच्या विभागात इथिओपियाच्या लिमाने दोन तास, 0.4 मिनिटे आणि .01 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थान, केनियाच्या किपचुंबाने दोन तास, 0.4 मिनिटे आणि 28 सेकंदाचा अवधी घेत दुसरे तर इथिओपियाच्या गेरेम्युने दोन तास, 0.4 मिनिटे, 41 सेकंदाचा अवधी घेत तिसरे स्थान मिळविले. या स्पर्धेमध्ये सुमारे 40 हजार धावपटूंनी आपला सहभाग दर्शविला होता.









