लंडन
ब्रिटनमधील जागतिक विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱयांची इच्छा ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. यामध्ये जगभरातील विविध देशांचे विद्यार्थी प्रवेश घेत असतात. परंतु जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यांची संख्या अव्वल राहिली असल्याची माहिती आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण घेण्यात 2018-19 मध्ये तिसऱया स्थानी तर 2019-20 मध्ये दुसऱया स्थानी भारत राहिल्याची माहिती आहे. उच्च शिक्षण सांख्यिकी एजन्सीच्या आकडेवारीनुसार लंडनच्या विद्यापीठांमध्ये 13,435 भारतीय विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. जी मागील वर्षी 7,185 च्या तुलनेत 87 टक्क्यांनी अधिक राहिली आहे. लंडन आंतरराष्ट्रीय व्यापार, गुंतवणूक तसेच प्रमोशन एजन्सी एज्युकेशन ऍण्ड टॅलेंड ऍण्ड लंडन ऍण्ड पार्टनर्सचे संचालक लॅलेज क्ले यांनी म्हटले आहे, की या आकडेवारीतून जागतिक विद्यापीठांच्या सद्य स्थितीचा अंदाज येत असून आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षण घेणाऱयांचे प्रमाण वाढतच असल्याचे दिसून आले आहे. यात येणाऱया काळात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.









