वृत्तसंस्था/ कोलंबो
लंकेचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू थिसारा परेराने सोमवारी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. परेराने आपल्या निवृत्तीच्या निर्णयाचे लेखी पत्र लंकन क्रिकेट मंडळाला दिले आहे.
32 वर्षीय थिसारा परेराने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 6 कसोटी, 166 वनडे आणि 84 टी-20 सामन्यात लंकेचे प्रतिनिधीत्व केले. 2014 साली बांगलादेशमध्ये झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतावर विजय मिळविणाऱया लंकन संघामध्ये परेराचा समावेश होता. लंकन क्रिकेट क्षेत्रामध्ये परेराचे योगदान महत्त्वाचे असल्याचे लंकन क्रिकेट मंडळाचे सीईओ ऍस्ले डिसिल्वा यांनी म्हटले आहे.









