नवी दिल्ली :
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू टॉम मुडी यांनी भारताचा रोहित शर्मा व ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर हे टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम सलामीवीर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू तसेच प्रख्यात प्रशिक्षक आणि क्रिकेट समालोचक 54 वर्षीय टॉम मुडी यांनी आपल्या ट्विटरवर आपल्या आवडीच्या खेळाडूंची माहिती दिली आहे. आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज हा फेव्हरिट संघ तर धोनी फेव्हरिट कर्णधार असल्याचे मुडी यांनी सांगितले. न्यूझीलंडचा कर्णधार विल्यम्सनला दैवी देणगी लाभली असून, रविंद्र जडेजा हा भारतीचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आणि कोहली आपला फेव्हरिट क्रिकेटपटू असल्याचे मुडीने म्हटले आहे.