सांबरा : मुतगे येथील न्यू इंग्लीश स्कूलचा दहावीचा विद्यार्थी रोहित हणमंत पाटील याने संकेश्वर (ता. हुक्केरी) येथे झालेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला तर प्राथमिक शाळेचा विद्यार्थी कुणाल उमेश निंबाळकर यानेही प्रथम खढमांक मिळविला आहे. या यशाबद्दल दोघांचा शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला.
रोहित पाटीलने यापूर्वी राजस्थान आणि इतर ठिकाणी झालेल्या कराटे स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केले आहे. तर इयत्ता सातवीचा विद्यार्थी कुणाल उमेश निंबाळकर याने कटाज या प्रकारात द्वितीय तर कुमिटे या प्रकारात प्रथम क्रमांक मिळविला आहे. सदर स्पर्धा शोटोकॉन कराटे डू स्पोर्ट्स अकॅडमी बेळगाव यांच्यावतीने घेण्यात आल्या होत्या. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक एम. वाय. केदार, प्राथमिकचे मुख्याध्यापक एस. आर. तिरवीर व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.









