फाईव्ह साईड फुटबॉल स्पर्धा : यंग बॉईज संघाकडे उपविजेतेपद
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
रोहन कुपेकर स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित रोहन कुपेकर चषक फाईव्ह साईड फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोहन डिफेंडर संघाने यंग बॉईज संघाचा 2-1 असा पराभव करून जेतेपद संपादन केले. मयूर मंडलिक याला उत्कृष्ट खेळाडू व रोहित पाटील याला उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरविण्यात आले.
बालिका आदर्श येथील बीटा स्पोर्ट्स क्लब टर्फ फुटबॉल मैदानावर उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन रोहन कुपेकरचे वडील राजू कुपेकर, सोमनाथ कुपेकर, मुकुंद कंग्राळकर, मारूती पावशे, श्रीकांत जाधव व रोहन कुपेकर स्पोर्ट्स फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते. मैदानाची पूजा करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत 22 संघानी भाग घेतला होता.
पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रोहन हिफेंडर संघाने गोगटे ज्युनियर संघाचा 2-0 असा पराभव केला. ज्युनव व नागदीप यांनी गोल केले. दुसऱया उपांत्य सामन्यात यंग बॉईज संघाने ब्रॅटवेट संघाचा 4-0 असा पराभव केला. उमरने सलग 3 गोल तर आदर्शने 1 गोल केला. अंतिम सामन्यात रोहन डिफेंडर्स व यंग बॉईज यांच्यात झाला.
पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी 1-1 अशी बरोबरी साधली. रोहन डिफेंडरतर्फे सिल्वेस्टर तर यंग बॉईजतर्फे मिहीरने गोल केला. दुसऱया सत्रात रोहन डिफेंडरच्या नागदीपने गोल करून 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे चंद्रकांत कडोलकर, राहुल उरणकर, राजू कुपेकर, उमेश मजुकर, विठ्ठल देसाई आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या रोहन डिफेंडर संघाला 17 हजार रूपये रोख व आकर्षक चषक तर उपविजेत्या यंग बॉईज संघाला 11 हजार रूपये व चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडु मयुर मंडलिक, उत्कृष्ट गोलरक्षक रोहित पाटील, उत्कृष्ट डिफेंडर तुषार पवार, उत्कृष्ट संघ गोगटे ज्युनियर यांना चषक देऊन गौरविण्यात आले. यावेळी सोमनाथ कुपेकर, मुकुंद कंग्राळकर, मारूती पावशे, सुभाष मोकाशी व रोहन कुपेकर स्पोट्स फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.









