वार्ताहर बागणी
शिगाव येथील वीर जवान रोमित चव्हाण हे जम्मू काश्मीर, शोपिया येथे आतंकवादी यांच्या बरोबर झालेल्या चकमकीत शहीद झाले. हजारोंच्या संख्येने सहभागी होत जनतेने त्यांना अखेरचा निरोप दिला. अनेकांच्या अश्रुंचे बांध फुटले वारणामाई देखील धाय मोकलून रडली असेल या विराच्या धाडसाला पाहून. वारणेच्या तीरावरती रोमित यांना निरोप देण्यात आला.
लहान बालकांपासून अबाल वृद्धांपर्यंत अनेकांनी अंत्ययात्रेत सहभागी होत शहीद रोमित यांना श्रद्धांजली वाहिली माणसाबरोबर जनावरे देखील या शहिदापुढे नतमस्तक झाले. नदी काठावर रोमित यांचे डिजिटल फलक लावण्यात आले आहे. या फलकासमोर जाऊन चक्क एका म्हैशीने आपले पुढचे दोन्ही पाय वाकवत नतमस्तक होत रोमित यांना अभिवादन केले. शिगाव येथील शेतकरी बांधव नदी काठावर नेहमीच जनावरे चरायला घेऊन जात असतात. त्यातील एका शेतकऱ्याची म्हैस ही नदी काठावर लावलेल्या शहीद रोमित तानाजी चव्हाण यांच्या डिजिटल फलका समोर जाऊन त्या म्हैशीने आपले पुढचे दोन्ही पाय टेकवत नतमस्तक झाली. त्यावेळी तेथे उपस्थित युवकांनी तो क्षण आपल्या मोबाईल मध्ये कैद करत सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. सध्या शिगाव परिसरात या व्हिडिओची चर्चा चांगलीच रंगली आहे. तर अनेकांनी आपल्या व्हाट्सएपच्या स्टेट्सला लावून ‘रोमित यांच्या शौर्यापुढे मूक जनावर देखील नतमस्तक झाल’ अशी वाक्य लिहत आदरांजली वाहिली आहे. भागात व जिल्ह्यात सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व फोटो चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे. शहीद रोमित यांच्या वीर बलिदानास मानाचा मुजरा करण्यात येत आहे. गावकऱ्यांनी देखील गावात शोक सभेचे आयोजन करून त्यांना श्रद्धांजली वाहत रोमित यांच्या स्मारकासाठी प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आहे.









