वृत्तसंस्था/ रोम
एटीपी टूरवरील येथे झालेल्या इटालियन खुल्या रेड क्लेकोर्ट पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या नोव्हॅक जोकोव्हिचने पाचव्यांदा एकेरीचे अजिंक्यपद पटकाविले.
सोमवारी झालेल्या पुरूष एकेरीच्या अंतिम सामन्यात टॉप सीडेड जोकोव्हिचने अर्जेंटिनाच्या शुवार्त्झमनचा 7-5, 6-3 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव केला. जोकोव्हिचचे एटीपी मास्टर्स स्पर्धेतील हे विक्रमी 36 वे विजेतेपद पटकावताना नदालच्या 35 अजिंक्यपदाचा विक्रम मागे टाकला. 2020 च्या टेनिस हंगामात जोकोव्हिचने आतापर्यंत विविध स्पर्धांमधील आपले 32 पैकी 31 सामने जिंकले आहेत. आता तो प्रेंच ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळविण्यासाठी सज्ज झाला आहे.









