वृत्तसंस्था/ माद्रीद
ब्राझीलचा महान जागतिक दर्जाचा फुटबॉलपटू रोनाल्डोने आपल्या पसंतीची सर्वोत्तम पाच फुटबॉलपटूंची यादी घोषित केली असून यामध्ये पोर्तुगालच्या ख्रिस्टीयानो रोनाल्डोला त्याने वगळले आहे.
सध्याच्या स्थितीत जागतिक फुटबॉल क्षेत्रामध्ये अर्जेंटिनाचा लायोनेल मेसी याला सर्वोत्तम खेळाडूची पसंती ब्राझीलच्या रोनाल्डोने दिली आहे. रोनाल्डोच्या सर्वोत्तम पाच फुटबॉलपटूंच्या यादीत लिव्हरपूलचा मोहम्मद सलाह, रियल माद्रीदचा एडन हॅझार्ड, पॅरीस सेंट जर्मनचे नेमार आणि ज्युलियन एम्बापे यांचा समावेश आहे.









