प्रतिनिधी / बेळगाव
रोट्रक्ट क्लब ऑफ बेळगावच्या सदस्यांनी नंदन मक्कळ धाम या अनाथ मुलांच्या संस्थेला भेट देऊन मदत केली. कोरोना काळात गरजू व्यक्ती किंवा संस्थांना जीवनावश्यक साहित्य देण्याचा निर्णय क्लबने घेतला. त्या अनुषंगाने क्लबने नंदन मक्कळ धाम संस्थेला हरभरा डाळ, मूगडाळ, मटकी, साखर, तेल आदी साहित्य दिले. तेथील मुलांशी संवाद साधला. रोटरी क्लबच्या रोटे. राधिका अगरवाल, रोटे. प्रयाग बजाज, कृष्णा अगरवाल, रेणुका हरदी व जियान मुल्ला यावेळी उपस्थित होते.









