13 विद्यार्थी नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी पात्र
प्रतिनिधी/ खेड
तालुक्यातील भरणे-बाईतवाडी येथील रोटरी इंग्लिश मिडियम स्कूलमधील अद्वैत भोसले याने नीट प्रवेश परीक्षेत 99.93 पर्सेनटाईलसह कोकणात अव्वलस्थान पटकावले. प्रशालेतील 13 विद्यार्थ्यांनी 95 पर्सेनटाईलपेक्षा अधिक गुण प्राप्त केल्याने नामांकित शासकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी ते पात्र ठरले आहेत.
या परीक्षेत अद्वैत भोसलेने 720 गुणांपैकी 680 गुण मिळवले. जीवशास्त्र विषयात 360 पैकी 360 गुण मिळवले. श्रावणी पार्ठे (99.84 पर्सेनटाईल), यश गांगल (99.48 पर्सेनटाईल), अय्युब चौगले (99.43 पर्सेनटाईल), अमेय मोरे (98.30 पर्सेनटाईल) या विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा अधिक गुण प्राप्त केले. सानिया मेमन (98.30 पर्सेनटाईल), धनश्री गावणकर (98.20 पर्सेनटाईल), मुक्ताई धामणस्कर (98.00 पर्सेनटाईल), पूजा रजपूत (97.74 पर्सेनटाईल), प्रेरणा गुजर (97.59 पर्सेनटाईल), आदित्य पोंक्षे (97.14 पर्सेनटाईल), श्रृती यादव (96.01 पर्सेनटाईल), श्रद्धा खेडेकर (95.61 पर्सेनटाईल) या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले.
या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेत गुणांचा उच्चांक गाठून एम्स, के.ई.एम., गॅड मेडिकल, सायन हॉस्पिटल, बी. जे. मेडिकल, ए.एफ.एम.सी. यासारख्या नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित केला आहे. संस्था चेअरमन बिपीन पाटणे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अनिल जोशी, सेक्रेटरी पराग चिखले, मुख्याध्यापिका भूमिता पटेल, निरंजन दळी आदी उपस्थित होते.









