बेळगाव : / प्रतिनिधी
बेळगाव इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजे बिम्सला रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे 500 पर्सनल प्रोटेशन इक्वीमेंट (पीपीई) संच देण्यात आले. सध्या कोरोनाशी बिम्सचे डॉक्टर व कर्मचारी अविरत लढत आहेत. त्यांच्या सुरक्षितेचा विचार करून हे किट देण्यात आले. क्लबचे अध्यक्ष रो. जीवन खटाव यांनी सदर किट बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांच्याकडे सुपूर्द केले.
त्यांनी या मदतीबद्दल क्लबचे आभार मानले. यावेळी रोटरीचे सचिव प्रमोद अग्रवाल, रो. शरद पै, रो. सचिन सबनीस आदी उपस्थित होते.









