प्रतिनिधी / बेळगाव
रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम आणि लेकव्हय़ू हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव ट्रफिक पोलिसांची नुकतीच मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. हे 10 दिवसांचे मोफत शिबिर होते. खासगी रुग्णालयात यासाठी सुमारे 500 रुपये आकारले जातात. या शिबिराचे उद्घाटन एसीपी (ट्रफिक) शरणप्पा यांच्या हस्ते करण्यात आले. नागरिकांनी हेल्मेट आणि सीट बेल्टचा नेहमी वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. या समारंभाला असि. गव्हर्नर रोटेरियन अजय हेडा यांच्यासह प्रसाद, सुजित, अरविंद, राजमाने, उमेश, सचिन, जगथ आदी सदस्य उपस्थित होते. रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष रोटे. अशोक काडापुरे यांच्या मार्गदर्शनानुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ‘स्लिप क्लिनिक’ या नव्या संकल्पनेचेही उद्घाटन करण्यात आले आहे.









