वनविभागातील कर्मचारी बुधवारीही मागण्यांवर ठाम : तोडगा निघाला नसल्याने पेच
प्रतिनिधी / बेळगाव
वन्य विभागात रोजंदारीवर काम करणाऱया कर्मचाऱयांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन छेडले होते. मात्र कोणताच तोडगा निघाला नसल्यामुळे बुधवारीही आंदोलन सुरूच ठेवण्यात आले आहे. जोपर्यंत समस्या सोडविण्यात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱयांनी केला आहे.
वनविभागातील कर्मचाऱयांनी नोकरीत कायमस्वरुपी सामावून घ्यावे, दररोज काम द्यावे, सरकारी नियमांनुसार आठ तास काम द्यावे, आठवडय़ाला एक सुटी द्यावी, यासह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन छेडले आहे. मात्र या कामगारांकडे कोणीच फिरकले नाहीत. त्यामुळे दुसऱया दिवशीही हे आंदोलन सुरू ठेवण्यात आले आहे.
वन्य विभागातील रोजंदारी कर्मचारी गेल्या अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. मात्र त्यांना अचानकपणे कामावरून कमी करणे, तसेच काम नाही म्हणून माघारी पाठविणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वेळेत वेतन दिले जात नाही. त्यामुळे आम्ही विविध समस्यांना तोंड देत आहोत, तेव्हा वेळेत वेतन द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.
मानव हक्काचे उल्लंघन होत आहे. बऱयाच वेळा कामगारांना सुटीच दिली जात नाही. जाणूनबुजून मानसिक त्रास देण्याचा प्रयत्नही वरि÷ अधिकाऱयांकडून होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. समान काम समान वेतन द्यावे, या मागणीसाठी हे आंदोलन सुरूच ठेवण्यात आले आहे.