लंडन
येथील वेम्बले स्टेडियममध्ये ईएफएल चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामना लिव्हरपूल-चेल्सी यांच्यात खेळविला जाणार आहे. लिव्हरपूल संघातील रॉबर्टो फर्मिन्हो या सामन्यात खेळू शकणार नाही, असे या क्लबच्या व्यवस्थापकाने सांगितले. दुखापतीमुळे त्याला या सामन्यातून बाहेर व्हावे लागले आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, ही लढत आज रात्री 10 वाजता खेळवली जाईल.
लिव्हरपूल क्लबच्या यापूर्वी झालेल्या नॉर्विच सिटी आणि लीडस् युनायटेड संघाविरुद्ध सामन्यात खेळताना फर्मिन्होला दुखापत झाली होती. ही दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. फर्मिन्होच्या जागी लिव्हरपूल संघामध्ये जोटाला संधी मिळेल, असे संकेत आहेत.









