मराठा मंदिरमध्ये आयोजन – डेस, साडय़ा-दागिन्यांचे प्रदर्शन-विक्री
बेळगाव / प्रतिनिधी
रेशीम आणि सुती साडय़ा, लग्नाच्या साडय़ा बनविणाऱया उत्पादकांचे प्रदर्शन भरविणाऱया ‘शगून’ या सेलचे शनिवारी रेल्वे ओव्हरब्रिज येथील मराठा मंदिरमध्ये उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘विव्हर्स वर्क्स’ या प्रदर्शनाचे माजी महापौर सरिता पाटील यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन झाले. याप्रसंगी पाहुणे म्हणून मराठा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, जायंट्स सखीच्या अध्यक्षा नीता पाटील, पूजा गुरव, अनंत लाड उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत सौरभ गुप्ता, समिन शाह व महेश शहा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन झाले.
शनिवारपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनात देशाच्या विविध भागातील 50 हून अधिक विव्हर्सनी भाग घेतला आहे. यामध्ये कर्नाटकची पेप सिल्क, जॉर्जेट सिल्क, अरिनी सिल्क व प्रिंटेड साडय़ा, बिहारच्या ऑरगॅनिक टसर सिल्क साडय़ा, सुट आणि स्टोल्स, तामिळनाडूच्या कांजीवरम सिल्क व डिझाईन फॅन्सी साडय़ा, आंध्रप्रदेश धर्मावरम, मंगलगिरी व गडवाल साडय़ा, उत्तरप्रदेशच्या लखनवी चिकन जामवार सिल्क आणि शिफॉन सिल्क साडय़ा, महाराष्ट्राचे डिझायनर डेस मटेरियल, पंजाबचे पटियाला आणि फुलकारी डेस मटेरियल, ओरिसाचे संबलपुरी, कॉटन साडय़ा, छत्तीसगडच्या रॉ सिल्क साडय़ा आणि दुपट्टा, मध्यप्रदेशच्या माहेश्वरी चंदेरी सिल्क, तर पश्चिम बंगालच्या बलूचारी, कंटा साडीज, आसामच्या मुगा सिल्क, तर जम्मू काश्मीरच्या काश्मीर सिल्क, राजस्थानच्या कोटा सिल्क, हॅन्ड ब्लॉक प्रिंट, डेस साडय़ा यासह आर्टिफिशियल दागिन्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.









