सावंतवाडी/प्रतिनिधी-
कारीवडे येथे रेशन परवाना मिळावा यासाठी जिल्हा बॅक संचालक महेश सारंग यांनी तहसिलदार कार्यालयासमोर सुरु केलेले उपोषण दुसरयादिवशीही सुरु होते.मंगळवारी सारंग यांच्या नेत्रुत्वाखाली पाचशेहुन अधिक ग्रामस्थानी रेशन परवाना मिळण्यासाठी उपोषणास सुरुवात केली होती. परंतु उपोषण लांबल्यास उपोलषणात सहभागी झालेल्या महीलांना आणि ग्रामस्थाना त्रास होऊ शकतो . त्यामुळे महीला व ग्रामस्थाना उपोषण स्थगित करण्याची विनंती सारंग यांनी केली. त्यांनी उपोषण स्थगित केले तरी महेश सारंग, सरपंच अर्पणा तळवणेकर,, प.स. सदस्या प्राजक्ता केळुस्कर, आनंद तळवणेकर, अशोक माळकर आदींनी उपोषण सुरु ठेवले. दुसरया दिवशीही उपोषण सुरु होते. माजी नगरसेवक अॅड परीमल नाईक, उदय नाईक यांनीही उपोषणाला पाठींबा दिला. रेशन परवान्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करतील असे सारंग यांनी सांगितले. रात्री सारंग यांची तब्येत बिघडली होती . वैदयकीय तपासणी करण्यात आली. उपोषणावर सारंग ठाम राहीले.









