प्रतिनिधी/ म्हापसा
रेव्हुलशनरी गोवातर्फे पोगाबील गेल्या अधिवेशनात सादर केले होते मात्र त्याकडे कुणीच लक्ष दिले नाही त्यासाठी पोगो रॅली गावागावात नेणार असे आश्वासन आम्ही दिले होते. बाणावलीत 4 हजार लोक जमले व नागरिकांची मागणी झाली की बार्देशातही एक पोगो रॅली व्हावी यासाठी सर्वांच्या मागणीवरून रविवार दि. 2 रोजी हणजूण चिवार मैदानावर सायं. 7 वा. भव्य दिव्य अशा पोगो रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती रेव्हुलशनरी गोवाचे प्रमुख मनोज परब यांनी म्हापसा श्री देव बोडगेश्वर देवस्थानच्या आवारात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी मयूर सावंत, रोहन कळंगुटकर, सॅबी फर्नांडिस, उमेश नाईक, चैतन बांदोडकर, गौरीश नाईक उपस्थित होते. आम्हाला या रॅलीसाठी परवानगी मिळाली नव्हती. शुक्रवारी सायंकाळी परवानगी मिळाली असून अवघ्या दोन दिवसात सर्व तयारी पूर्ण केली आहे. या रॅलीत राज्यातील सर्व नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी केले. आम्ही सर्वत्र बॅनर तसेच पत्रके वाटून जनजागृती केलेली आहे. आम्ही हे आव्हान म्हणून स्विकारून दोन दिसात ही पोगो रॅली घडवून आणणार आहे. आम्हाला गोमंतकीयावर विश्वास आहे व या रॅलीत सर्वजण भाग घेणार आहेत अशी माहिती मनोज परब यांनी दिली.
हे बील संबंध गोमंतकीयांसाठी आहे. गेल्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी पोगो बील पुढच्या विधान सभेत घेणार असे आश्वासन दिले होते मात्र काल काही पत्रकारांनी या बीलाबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विचारले असता त्यांनी असे काही बील येणार नाही असे स्पष्ट केले. जर तुम्हाला राग आहे, हा सरकार खरोखरच जनतेला मदत करणार, जो काही आमचा हक्क आहे तो राखून ठेवणार असे वाटत असल्यास सर्वानी या पोगो रॅलीत सहभागी व्हावे असे ते म्हणाले.
आज सरकार रेव्हुलशनरी गोवाला घाबरत आहे. आमच्या कॉर्नर बैठका होत आहे. आम्ही सरकारावर दबाव आणला आणि सर्वजण आम्ही एकत्रित राहीलो तर सरकारला पोगो बील सादर करावेच लागणार असे मनोज परब यांनी सांगितले. या रॅली करण्यासाठी नागरिक आम्हाला पुरस्कृत करतात. आम्ही कुठल्याही पक्षाशी निगडीत नाही. त्यांना आमच्यावर विश्वास आहे त्यामुळे आम्हाला कोणकोण …देत असतात त्यामुळे फंडींगची त्याप्रमाणात गरज भासत नाही अशी माहिती त्यांनी दिली.
चाळीसही आमदारांनी तुमच्या बिलाची दखल घेतली नाही मग कुणालाच यात रस नाही असे आपल्यास वाटत नाही काय? असा प्रश्न पत्रकारांनी मनोज परब यांनी केला असता ते म्हणाले की, त्यांनी दखल घेतली तर कुठेतरी रेव्हुलशनरी गोवन प्रकाश झोतात येणार असे त्यांना वाटते. पण त्यांना माहीत नाही की आज ते आम्हाला इतके सहज घेतात तर आमच्या कोपरा बैठकालाच लोक मोठय़ा प्रमाणात जमतात. पुढच्या रॅलाही मोठय़ा प्रमाणात होमार आहेत. असे ते म्हणाले.









