ऑनलाईन टीम / मुंबई :
टॅक्सी चालकाने वेश्या वस्तीत नेण्यास नकार दिल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने टॅक्सीचालकावरच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी अमित धाकड या जवानाला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर नगर पोलीस ठाण्यात आरोपीवर भादंवि 377, 394, 387, 341, 324, 504 आणि 506 (2) कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर आरपीएफने आरोपी जवान अमितचे तातडीने निलंबन केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 11 जानेवारी रोजी आरोपी जवान अमित धाकड याची रात्री 11 वाजता डय़ुटीची वेळ संपली. त्यानंतर त्याने एका टॅक्सीला हात केला. टॅक्सीचालकाला त्याने ग्रॅन्ट रोड येथील वेश्या वस्तीत नेण्यास सांगितले. मात्र, टॅक्सीचालकाने त्याला नकार दिला. त्या रागातून जवानाने टॅक्सीचालकाला बेदम मारहाण करत रेल्वेच्या हद्दीतील निर्जन स्थळी नेऊन त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर त्याच्याकडील पैसे आणि गाडीची चावी घेऊन तो फरार झाला होता.